Blog
भाजपा महायुती सरकार कामगार वर्गाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील — जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन

भाजपा महायुती सरकार कामगार वर्गाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील — जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन
जामनेर -( प्रतिनिधी ) वृषभ इंगळे
आज जामनेर विधानसभा मतदारसंघातील केकतनिंभोरा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगार बंधू-भगिनींसाठी मोफत गृहपयोगी साहित्य संच वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमास उपस्थित राहून सर्व कामगार बंधू-भगिनींसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामहायुती सरकार सदैव कामगार वर्गाच्या हितासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लाभार्थी कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते.



