कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांना डच्चू ? अनिल पाटील यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची राजकीय चर्चा गरम

संपादक – सदाशिव इंगळे
जळगाव — कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी यांच्या बाबत केलेले वक्तव्य व विधान परिषद मध्ये
रमी ( पत्ते ) खेळतांना चे फोटो , व्हीडीओ समोर आल्याने या प्रकारा बाबत सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे .
या घडलेल्या प्रकारा बाबत त्यांना मंत्री पदावरून तात्काळ हटवण्यात यावे , यासाठी विरोधकांनी राज्यभर आंदोलन , अस्त्र बाहेर काढले आहे .
त्यामुळे भाजपा , शिवसेना , राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व महायुती सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे .
मंत्री कोकाटे यांच्या सह इतर आमदार व मंत्र्यांवर ही आरोपांची फैरी सुरू असल्याने अनेक मंत्र्यांचे कार्यभार काढण्यात येऊ शकतात ? अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे .
मंत्री कोकाटे हे रा कॉ अजित दादा पवार गटाचे आमदार आहेत ,
अजित दादांचा स्वभाव पाहाता , सरकार मध्ये प्रामाणिक पणे काम करण्याची त्यांची पद्धत पाहता मंत्री कोकाटे यांना ते नक्कीच राजीनामा मंत्री पदाचा द्यायला आदेश देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे .
जर का ? कोकाटे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर चे आमदार श्री अनिल भाईदास पाटील यांना मंत्री पदाची संधी दिली जावू शकते .
असा कयास राजकीय गोटात वर्तवण्यात येत आहे
जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव देवकर , सतिश अण्णा पाटील यांचे सह अनेकांनी अजित दादा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून रा कॉ पक्षात प्रवेश केलेला आहे .
त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला वाढीसाठी बळकटी मिळावी म्हणून मंत्रीपदी अनिल पाटील यांची वर्णी , त्यांना (पुन्हा चान्स )
दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
हा जर तर चा प्रश्न असुन थोड्याच दिवसात महायुती सरकारचे नेतेगण काय निर्णय घेणार हे कळेलेच .
अनिल पाटील यांना मंत्री पदाची लॉटरी लागल्यास जळगाव जिल्ह्याला ५ मंत्री लाभणार आहे .

सदाशिव इंगळे – संपादक दैनिक जळगाव प्रहार



