गारखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल सर्वेक्षणाला गती डॉ. दानिश खान यांची जामनेर पुरा उपकेंद्राला भेट


गारखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल सर्वेक्षणाला गती
डॉ. दानिश खान यांची जामनेर पुरा उपकेंद्राला भेट
जामनेर — प्राथमिक आरोग्य केंद्र गारखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दानिश खान यांनी नुकतीच आरोग्य उपकेंद्र जामनेर पुरा येथे सिकलसेल आजाराच्या सर्वेक्षणासाठी भेट दिली. या भेटीदरम्यान सिकलसेल तपासणी, नोंदणी, जनजागृती व उपचार संदर्भातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, पंचायत समिती जामनेर यांच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करून नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे कशा पोहोचतील, यावर डॉ. दानिश खान हे नेहमीच लक्ष ठेवून असतात. सिकलसेलसारख्या गंभीर आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले तसेच सर्वेक्षणाचे काम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर तपासणी, उपचार व सल्ला मिळावा, यासाठी गारखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉ. दानिश खान यांचा कार्यतत्परपणा, नियोजनबद्ध कामकाज आणि लोकहिताची तळमळ यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे राबविल्या जात आहेत.
खरंच, गारखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. दानिश खान सरांसारखे संवेदनशील, जबाबदार व कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी लाभणे हे भाग्याचे मानले जात असून त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.



