जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामसेवक रवींद्र तायडे यांचा सेवा पूर्ती सोहळा संपन्न

जामनेर – वृषभ इंगळे (जामनेर प्रतिनिधी)
शासकीय सेवेत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवा पूर्ती सोहळा काही नवीन नाही. परंतु काही माणसं आपल्या कामाच्या जोरावर जनमाणसांच्या मनावर आपली वेगळीच प्रतिमा मांडता.त्यातच तळेगाव ग्रामसेवकाची सेवा पूर्ती सोहळा झाला तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी शासकिय कर्मचारी व गाव लोटलं. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंनी दाटलेले आपलेपणाचे भाव होते. असे भाऊसाहेब प्रत्येक गाव-खेड्याला लाभले तर देशाचं किती भलं होईल .
जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील ग्रामसेवक रवींद्र तायडे यांची सेवा पूर्ती झाल्याने त्यांचा सेवा पूर्ती सोहळा ठेवण्यात आला होता. सेवा पूर्ती सोहळ्यात गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. मागील काही वर्षांपासून तायडे साहेब हे तळेगाव ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होते सुरुवातीपासूनच सर्वांसोबत मिळते जुळते घेतले. ग्रामपंचायत म्हणजे आपसातील वाद, अंतर्गत कुरघोडी असतात. परंतु तायडे यांनी कार्य उत्तम पेलत आपल्या कामाच्या आणि मवाळ स्वभावातून सर्वांना आपलेसे केले. लहानपणापासूनच अंगी धार्मिक वृत्ती त्यातूनच लहान-थोर मंडळीना ‘ भाऊ,’ या शब्दाने आवाज देऊन येथील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर करून तळेगाव ग्रामपंचायती चा विकास साधला. गावात वृक्ष लागवड, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविल्या. नागरिकांनीही मोलाची साथ देत आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहून गावचा विकास साध्य केला. आपल्या भाऊसाहेबाला निरोप देण्यासाठी सर्वच शासकिय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.



