ग्रामीण

“माझी ई- शाळा एक डिजिटल साक्षर हायब्रीड शिक्षणं प्रणाली समग्र शिक्षण महाराष्ट्र शासन आणि प्रथम इन्फोटेक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यात “माझी ई शाळा” हा उपक्रम जि. प.नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ३०० शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. माझी ई शाळा कार्यक्रमा अंतर्गत आज रोजी शहादा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या उपस्थितीत अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी शाळा येथे माझी ई शाळा कार्यक्रमाची कार्यशाळा संपन्न झाली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. राजपूत, डाएट विषय साधन व्यक्ती माधवराव मोरे, विनोद चव्हाण, प्रथम इन्फोटेक फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक राकेश आगळे, तालुका समन्वयक सविन पाडवी व ५० शाळांचे तंत्रस्नेही मुख्याध्यापक -शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते.यावेळी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन अंतर्गत १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्याची माझी डिजिटल शाळा याविषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्यात तालुक्यांत प्रथम येणाऱ्या विध्यार्थी चा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान डॉ. योगेश सावळे यांनी केला व शिक्षकांना शाळेतील उपलब्ध डिजिटल संसाधने सुरू करून त्यांचा वापर नियमित करावा असे सुचविले तसेच डिजिटल अभ्यासक्रमामुळे आपल्याला वर्गात अध्ययन व अध्यापन पद्धतीमद्ये मदत होते हे पटवून दिले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. राकेश आगळे यांनी माझी ई शाळा हा उपक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० याविषयी चर्चा केली, व डिजिटल साक्षर सॉफ्टवेअर चा याच्याशी काय संबंध येतो व आपल्या शाळेत अभ्यासक्रमात कशी मदत होते ते समजावून सांगितले. तसेच डिजिटल अभ्यासक्रमाची रचना कशी केली आहे ते सांगीतले व सध्याच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर शालेय शिक्षणात कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल व राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या क्षमता तंत्रज्ञानाचा वापर करून कसे साध्य करू शकतो हे सादरीकरणाच्या माध्यमातुन सांगीतले. शेवटी सर्वांचे आभार मानले व डिजिटल शिक्षणं प्रणाली चा नियमित उपयोग करावा हे सांगून कार्यशाळा यशस्वी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}