नाशिक येथे बच्चु कडू यांच्या हस्ते संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार गोपाल गावीत यांना प्रदान.

नाशिक येथे बच्चु कडू यांच्या हस्ते संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार गोपाल गावीत यांना प्रदान.

 

नाशिक – प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे वतीने संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा के. टी. एम. एच. कॉलेज, रावसाहेव थोरात ऑडिटोरियम, नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष तथा माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चु कडू यांच्या हस्ते शिक्षण, साहित्य आणि समाजात सेवेच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे प्राथमिक शिक्षक नवापूर तालुक्यातील मूळ गाव बालअमराई येथील गोपाल होनजी गावीत यांना ” संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान पुरस्कार अभियान नाशिक विभागीय प्रथम क्रमांक संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित केले. नाशिक येथे झालेल्या त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला.

 

गोपाल गावीत प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणमाळ ता. नवापूर तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार यांच्यामार्फत वृक्षारोपण अभियान, रक्तदान शिबिर, जिल्ह्यातील दुर्गम भागातील तसेच वाडी, वस्ती,पाड्यातील अनेक प्रलंबित प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात न्याय मिळवून देण्यात प्रशासनाकडे निवेदने, आमरण उपोषण, तूरवाद्य आंदोलन, अग्रेसर कार्य, विद्यार्थ्यांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग, समाजसेवा आणि भारत सरकारने स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था. ही संस्था भारतीय संस्कृतीला शिक्षण व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठी आणि लोकांना भारतीय सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देण्यासाठी काम करते. भारत सरकार नवी दिल्ली सांस्कृतिक संसाधन और प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली, हैद्राबाद, गुवाहाटी आसाम या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय स्वातंत्र्य संग्रामलढ्यात ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलेले आहे त्या स्वातंत्र्यसैनिकांची यशोगाथा लेखन केलेले आहे. स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात शहीदांच्या शौर्यकथा साहित्यिक स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम निष्ठा आणि वचनबद्धतेने केले आहे. त्यांच्या समर्पण आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने केवळ शिक्षण जगाला अभिमानास्पद बनवले नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासही प्रेरणा दिली आहे.

 

मा. शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी गोपाल गावीत यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हणाले “असे शिक्षक आपल्या समाजाचे अमूल्य खजिना आहेत, जे शिक्षणाला केवळ नोकरी मानत नाहीत तर राष्ट्रसेवेचे साधन मानतात. गोपाल गावीत यांचे कार्य समाजात, तरुण पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे.”

 

या सत्कार समारंभाला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तसेच नाशिक विभागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्ती आणि सामाजिक जाणीवेचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून आले.

 

गोपाल गावीत यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नाही तर संपूर्ण शिक्षण जगतासाठी आणि देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रसंगी निरीक्षक महेश बढे, निलेश वाटाणे, कुणाल राऊत, नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, दिव्यांग जिल्हाध्यक्ष ललित पवार, चंद्रभान गांगुर्डे, सविता जाधव, बबलू मिर्झा, समाधान बागल, अमजद पठाण, नितीन गव्हाने, अमोल अडांगळे, शाहनवाज शेख, संजय तिवडे, नाना शिंदे, अनंता उपाध्ये, शाम गोसावी, शरद शिंदे, दत्तु बोडके, विलास कानकाट, दत्ता कांगणे रविंद्र टिळे, आरुण पाचोरे, अमोल फडताळे, तुषार खैरनार, तुकाराम अलट आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावनकुमार यांनी गोपाल गावित यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Jalgaonprahar

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.

Site Links

Follow Us

© 2026. jalgaonprahar.com | All Rights Reserved