शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तरुणाच्या पाठीवर ना. गिरीशभाऊंची थाप! जामनेरमध्ये ‘भूषण हेअर स्टुडिओ’चे थाटात उद्घाटन

 

 

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या तरुणाच्या पाठीवर ना. गिरीशभाऊंची थाप! जामनेरमध्ये ‘भूषण हेअर स्टुडिओ’चे थाटात उद्घाटन

​जामनेर:

शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी असली की यशालाही तुमच्यापर्यंत यावेच लागते, याचा प्रत्यय जामनेरमध्ये नुकताच आला. नाभिक समाजाचे उमदे आणि तळफदार युवा व्यक्तिमत्त्व श्री. भूषण जाधव यांच्या ‘भूषण हेअर स्टुडिओ’ या भव्य आणि अद्ययावत दालनाचा उद्घाटन सोहळा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.

​दिग्गज मान्यवरांची मांदियाळी

एका सामान्य तरुणाने कष्टाच्या जोरावर उभ्या केलेल्या या नव्या साम्राज्याला प्रोत्साहन देण्यासाठी जामनेरमधील अनेक राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

​जामनेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्रजी पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब, डॉ. प्रशांत भोंडे, दीपकभाऊ तायडे आणि मा. ना. गिरीशभाऊंचे स्वीय सहाय्यक यांनी याप्रसंगी विशेष उपस्थिती दर्शवली. यासोबतच, नगरसेवक आतिश झल्टे, नगरसेवक तेजस पाटील, नगरसेवक सुहास पाटील, जामनेर तालुका नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत शिंदे, जिल्हा युवक अध्यक्ष अनिलभाऊ शिंदे, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष कैलासभाऊ वाघ, शहर युवक अध्यक्ष नानाभाऊ पवार आणि श्री संत सेना बहुउद्देशीय संस्थेचे संचालक सुनीलभाऊ जाधव या सर्वांनी उपस्थित राहून भूषण जाधव यांचा उत्साह वाढवला.

​ना. गिरीशभाऊंकडून नव्या वाटचालीस बळ

उद्घाटनप्रसंगी बोलताना ना. गिरीशभाऊ महाजन यांनी स्टुडिओचे संचालक भूषण जाधव यांच्या या धाडसी व स्वतंत्र व्यावसायिक वाटचालीचे विशेष कौतुक केले. नव्या पिढीने स्वतःच्या पायावर उभे राहून अशी प्रेरणादायी पावले उचलावीत, असा संदेश देत त्यांनी भूषण जाधव यांना पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभाशीर्वाद व सदिच्छा दिल्या.

​तरुणांसाठी एक नवा आदर्श

“मेहनत अशी करा की, यशाला तुमच्यापर्यंत येण्याशिवाय पर्यायच उरू नये!” या उक्तीला सार्थ ठरवत भूषण जाधव यांनी घेतलेली ही गरुडझेप जामनेर तालुक्यातील तरुणांसाठी नक्कीच एक आदर्श ठरणार आहे. एका नव्या व्यवसायाच्या रूपात मिळालेली ही नवी सुरुवात आणि नव्या स्वप्नांना मिळालेल्या या भरारीबद्दल भूषण जाधव यांच्यावर सध्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Jalgaonprahar

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.

Site Links

Follow Us

© 2026. jalgaonprahar.com | All Rights Reserved