नवापूर देवलफळी चौफुली येथे 22 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग बंद करून आंदोलन. जि.प.माजी अध्यक्ष श्री.भरत गावित यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम यांना निवेदन.
नवापूर देवलफळी चौफुली येथे 22 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग बंद करून आंदोलन. जि.प.माजी अध्यक्ष श्री.भरत गावित यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम यांना निवेदन.
नंदुरबार – आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ट्रायबल अॅडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी या मागणीसाठी दि. २२ जुलै रोजी सुरत-नागपूर महामार्ग बंदचे आंदोलन नवापूर देवलफळी येथे करण्यात येणार असल्याचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. याबाबत माजी जि.प.अध्यक्ष भरत गावित, के.टी. गावित, व हिरामण पाडवी, विजय ठाकरे आदी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री मॅडम यांना निवेदन सादर केले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आजतागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलची बैठक घेणेत यावी याबाबत दिनांक २८ जूनपासून आजपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून न्याय हक्कासाठी सुरु होते. आंदोलनात अनेक आदिवासी सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षांनी सुध्दा पाठींबा दिला होता व काहींनी आंदोलनात सुध्दा सहभाग घेतला आहे. धरणे आंदोलनाचा आज १८ वा दिवस असतांना सुध्दा प्रशासनाने आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे नाईलाजस्तव शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. २२ जुलै रोजी ठिक १२.०० वाजता सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, ठिकाण देवलफळी चौफुली नवापूर येथील हायवे ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलची बैठकीची लेखी तारीख ट्रायबल एडव्हायझरी कौन्सिलच्या बैठकीत क्रमांक १ ते क्र. २१ मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक चर्चा घडवून मागण्या सोडविण्याची हमी देणेची लेखी आदेश देणेत यावा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनात जिल्हा परिषद सदस्य भरत गावित, के.टी. गावित, हिरामण पाडवी, विजय ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.