वाढदिवसाचा खर्च टाळत काथर्दे खुर्द येथील जि. प.शाळेतील मुलांना वॉटर बाटलीचे वाटप.
वाढदिवसाचा खर्च टाळत काथर्दे खुर्द येथील जि. प.शाळेतील मुलांना वॉटर बाटलीचे वाटप.
नंदुरबार दि.२३ शहादा तालुक्यातील काथर्दे खुर्द येथील प्रतिष्ठीत नागरीक तसेच काथर्दे खुर्द गावाचे वायरमन भूषण भगवान पाटील यांचा मुलगा मयंक याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काथर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना पाणी बाटलीचे वाटप भुषण भगवान पाटिल यांच्या कडुन करण्यात आले.मी याच शाळेत शिकलो आहे म्हणून शाळेसाठी काही तरी सहकार्य करावे अशी मनोमन इच्छा होती कारण मी या शाळेचे काहीतरी देणे लागतो .
शाळा ही समाजाचा घटक आहे आणि असे सहकार्य शाळेला नेहमी गावचे असले पाहिजे असे प्रतिपादन भूषण पाटील यांनी मत व्यक्त केले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री भरत पावरा , शिक्षक श्री श्रीकांत वसईकर, श्री. खेमा वसावे, श्री.तुकाराम अलट तसेच श्री भूषण पाटील यांच्या पत्नी सौ. वर्षा भूषण पाटील, मातोश्री सौ. सुनिता भगवान पाटील, ग्रामपंचायत शिपाई सुभाष कोळी आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची खात्री करण्यासाठी वॉटर बेल्स ठेवण्याच्या दृष्टीने सामाजिक उपक्रम म्हणून शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असलेले दातृत्व श्री भूषण पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक भरत पावरा यांनीही अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण असं उपक्रम म्हणून वाढदिवसाच्या औचित्य साधून वाढदिवसाचा अनर्थ खर्च टाळत विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पाणी बॉटल चांगला उपक्रम आहे.शिक्षक श्री. तुकाराम अलट यांनी सांगितले की, पाण्याच्या कमी सेवनामुळे लोकांमध्ये आजार वाढल्याने वॉटर बेलची कल्पना पुढे आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हायड्रेट ठेवण्यास मदत होईल. पाणी पिण्यासाठी बॉटलचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील. विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. पाण्याची घंटा, मुलांना पाणी प्यायला सांगितल्यावर ब्रेक होतो. यामुळे मुलांमध्ये निर्जलीकरण आणि लघवीचे संक्रमण टाळता येईल, असेही ते म्हणाले.