तिकीट मिळण्याचे फायनल असल्यास नक्कीच जामनेर विधानसभा निवडणूक लढवेल — दिलीप खोडपे सर
तिकीट मिळण्याचे फायनल असल्यास नक्कीच जामनेर विधानसभा निवडणूक लढवेल — दिलीप खोडपे सर
जळगाव प्रहार -वृषभ इंगळे
जामनेर – जामनेर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मला गळ घातली जात असुन तिकीट मिळण्याचे फायनल असल्यास नक्कीच आमदार की साठी उभा राहिल असे स्पष्ट मत भाजपाचे माजी जिप अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी दैनिक जळगाव प्रहार शी बोलतांना व्यक्त केले .
राष्ट्रवादी कॉग्रेस शरचद्र पवार गटा तर्फे तुतारी या चिन्हावर जामनेर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे ,
जामनेर मतदार संघाचे सध्याचे प्रतिनिधी त्व आमदार गिरीश भाऊ महाजन ( कॅबीनेट मंत्री ) हे करीत आहेत ,
सहावेळा ट्रम त्यांची झाली असून यंदा ७ व्या दा त्यांनाच उमेदवारी भाजपा कडून मिळेल यात शंका नाही . त्यांच्या विरुद्ध तगडा , मुरब्बी जाणकार (मते खेचुन ) आणू शकेल असा उमेदवार सध्या शोध सुरु आहे ,
नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या राजकीय चाणक्य नितीने त्यांचे विरुद्ध तगडे आव्हान देणारे विरोधक यांना त्यांच्या गळाला लावून भाजपा मध्ये प्रवेश करून घेतलेला आहे .
त्यासाठी भाजपा तून एखादा व्यक्ती गट फोडायचा व त्याला उमेदवारी द्यायची अशी हालचाल सुरू असल्याचे राजकीय वार्ता आहे .
राकॉ शरदचंद्र पवार पक्षातर्फे मला चारवेळा बोलवणे झाले आहे , मात्र जागा कुणाला सुटेल हे अजून नक्की नाही , वातावरण चांगले प्रतिकूल असल्यास व तिकीट फायनल असल्यास नक्कीच विचार करून निर्णय घेइल असे स्पष्ट भावना दिलीप खोडपे सर यांनी मांडल्या .
त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक मध्ये नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या समोर कुणाला विरोधक उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे .