रांगोळीमुळे वाढतेय कार्यक्रमाची शोभा! ‘संस्कृती’ संवर्धनासह कलाकारांना मिळतोय रोजगार- भगवान वानखेडे

जामनेर – वृषभ इंगळे
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते. संस्कृतीच्या परंपरेत रांगोळीला फार महत्त्व आहे. पूर्वीपासून प्रत्येक घरी देवघरापासून पासून ते अंगणापर्यंत रांगोळी टाकल्याशिवाय घराला घरपण येत नाही.
अलीकडे आधुनिकीकरणाच्या काळात ही संस्कृती मोठ्या प्रमाणावर जपली जात आहे .विविध कार्यक्रमांसाठी ‘रांगोळीची क्रेझ’ वाढली आहे
अलीकडे रांगोळी कला हा प्रकार स्वतंत्रपणे शिकवला जात असून युवकांचाही सहभाग वाढला असून या कलेच्या माध्यमातून अनेकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.
छोट्या कार्यक्रमासह आता मोठ्या शहरातील अनेक कार्यक्रमामध्ये प्रवेशद्वारावर रांगोळी हवी अशी मागणी वाढत आहे. यामुळे रांगोळीचे विविध प्रकार बघायला मिळू लागले आहे.
याला तंत्रज्ञानाची देखील जोड मिळत असून अनेक रंगसंगतीमध्ये आकर्षक आणि देखण्या रांगोळ्या कलाकारांकडून साकारल्या जात आहे. यातच अनेक कलाकारांनी काढलेल्या रांगोळ्यांनी विक्रम देखील रचले आहे. रांगोळींमुळे अनेक कलाकरांना एक वेगळी ओळख देखील मिळू लागली आहे.
यामध्ये जामनेर तालुक्यातील रांगोळी कलाकार भगवान वानखेडे हे देखील आपले नशीब या क्षेत्रात आजमावू लागले आहे. जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध कलाकार भगवान वानखेडे यांनी कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या स्वरुपा नुसार ते रांगोळी चे रेखाटन करीत असता. अगदी कोणत्या ही प्रकारच्या व भव्य मोठ्या साईज ची रांगोळी ते काढत असता.
आता पर्यंत ते नुसते जामनेर नाही तर महाराष्ट्र बाहेर सुद्धा त्यांनी या आपल्या कलाची छाप सोडली आहे.
त्यांना आता पर्यंत शाळे मध्ये किंवा विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळीच्या स्पर्धा मध्ये परवेक्षक साठी बोलवण्यात आले होते.
जामनेर तालुक्यातील शास्त्रीनगर भागाचे नाव ते अख्या जिल्ह्यात गाजवत आहे.




