श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊट-गाईड कार्यशाळेचे आयोजन.
श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात स्काऊट-गाईड कार्यशाळेचे आयोजन.
नंदुरबार दि.२६ श्रीमती प्र. अ सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर याठिकाणी जि. प.शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक, नंदूरबार भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठार जिल्हा प्रशिक्षण आयुक्त छाया पाटील, जिल्हा स्काऊट संघटक सुधाकर साखरे, जिल्हा गाईड संघटक संगिता रामटेके, शिक्षण विस्तार अधिकारी आर.सी.पवार, प्राचार्य मिलिंद वाघ, प्रतिभा पवार उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सुधाकर साखरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून स्काऊट नोंदणी प्रक्रिया, ऑनलाईन ओआयएमएस पोर्टल, युआयडी, प्रशिक्षणाचे फायदे व टप्पे याविषयी सखोल माहिती दिली.
शिक्षण विस्तार अधिकारी आर. सी. पवार यांनी आपल्या लहानपणी स्काऊट आणि गाईड उपक्रमांच्या आठवणींना उजाळा देत शासन परिपत्रकाविषयी सखोल माहिती देत तसिका निजोजन व स्काऊट गाईड च्या माध्यमातून मूल्य शिक्षण,स्वावलंबन,देशप्रेम, शिस्त विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे काळाची गरज आहे असे सांगितले.
संगिता रामटेके यांची स्काऊट अभ्यासक्रम शिकविण्याच्या पद्धती विषयी माहिती दिली. तर छाया पाटील यांनी शिक्षक पुरस्कार, मेळावे, उपक्रम, याविषयी सखोल माहिती दिली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अमोल दिवटे सर यांनी तर आभार प्रदर्शन कर्नलकुमार वसावे यांनी केले.