पुरस्काराची रक्कम सावित्रीच्या लेकींचा शिक्षणासाठी” राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र पाटील यांच्या स्तुत्यनिर्णय
“पुरस्काराची रक्कम सावित्रीच्या लेकींचा शिक्षणासाठी” राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र पाटील यांच्या स्तुत्यनिर्णय
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा येथील उपक्रमशील मुख्याध्यापक रविंद्र भाईदास पाटील यांचा ५ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. एक लाख दहा हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
शिक्षक रवींद्र पाटील यांनी बोलताना सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला व आपल्या शिक्षकी पेशाला संपूर्णपणे झोकून दिले. शिक्षण घेत असताना हुशारी सोबत आर्थिक मदतीची आवश्यकता असते. आपल्या विद्यार्थिनींचा शिक्षणात आर्थिक कारणाने खंड पडू नये म्हणून आपल्या पुरस्काराच्या रकमेतून सर्व विद्यार्थिनींना स्पोर्ट्स गणवेश तसेच उर्वरित रकमेद्वारा दरवर्षी सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे त्यांनी जाहीर केले. कन्या शाळेतील विद्यार्थिनी ह्या आदिवासी गोरगरीब, शेतमजूरी, हातमजुरी करणाऱ्यांचा पाल्य असून त्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये आपल्या विद्यार्थिनींचा सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अविरतपणे कार्य सुरू आत्तापर्यंत त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पहिली रेल्वे लुक शाळा, विद्यार्थिनींना शाळेत येण्याचे आकर्षण ठरले आहे, कोविड काळात शिक्षण रथ नामक चालती फिरती डिजिटल शाळा. मिपा छत्रपती संभाजी नगर या संस्थेद्वारा विशेष कार्य करणारी शाळा म्हणून गौरव करीत फ्लिप बुक मध्ये शाळेचे कार्य समावेश. महाराष्ट्रातून एकमेव एनसीईआरटी अंतर्गत एनसीएसएल निपा दिल्ली या ठिकाणी पीएम ई -विद्या चॅनल वर “ग्रामीण भागातील मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक ” म्हणून थेट प्रक्षेपणाद्वारे मुलाखत तसेच विविध उपक्रमामुळे जिल्हा परिषद कन्या शाळा ही नावारूपास आलेली आहे.
माझ्या या यशामागे माझे कुटुंबीय तसेच माझी पत्नी प्रियंका पाटील मागील बारा वर्षापासून सहकारी शिक्षिका म्हणून सोबत कार्य करीत आहे तसेच इतर सहकारी शिक्षक, अधिकारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी यांच्या सिंहांचा वाटा आहे. पुरस्कारामुळे एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते व ही ऊर्जा घेऊन हे कार्य अखंडपणे सुरू राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.