Blog
तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यकारी संचालक पदी – मा. प्रकाश पवार साहेब …

तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यालया मध्ये कार्यकारी संचालक पदाचा मा. प्रकाश पवार यांनी आज पदभार स्वीकारला , नागपूर येथून त्यांना पदोन्नति मिळाली असून कामाचा दांडगा अनुभव असल्याने व समन्वयातून चांगले काम होते याचा भरपूर अनुभव त्यांना असल्याने याचा फायदा तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव कार्यालयाला होईल. अनेक ठिकाणी त्यांनी कामे केली असल्याने निर्भड स्वच्छ प्रतीमा असणारे अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे, 31 मार्च 2025 रोजी श्री. प्रकाश पवार यांचा सेवाकाल समाप्त होत असल्या मुळे कमी कालावधीत आपल्या कामाचा कशा प्रकारे ठसा उमटवितात या कडे सर्वाचे लक्ष राहील..पदभार स्वीकारल्यानंतर दैनिक जळगाव प्रहार चे संपादक श्री सदाशिव इंगळे यांनी त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.



