ग्रामीण

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांचे मानधन द्या ; जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांचे मानधन द्या ; जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

नंदुरबार दि.४ (प्रतिनिधी) मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांचे मानधन तात्काळ मिळावे अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी निवेदन सादर करण्यात आले आहेत. मार्फत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य सचिव यांच्याकडे केली आहे. मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्यांमध्ये एकाच वेळी जानेवारी व फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात
आले होते. ते सर्वेक्षण करत असताना अनेक अडचणींना तोंड देत प्रगणकांनी यशस्वीपणे आपले कर्तव्य पार पाडले.
या सर्वेक्षणासाठी मानधन देण्यात येईल याबाबतची कल्पना प्रशिक्षण सत्रांमध्ये देण्यात आली होती. मात्र, सर्वेक्षण होऊन जवळजवळ एक वर्ष होत आले आहेत. मात्र, कोणतेही मानधन प्रगणकांना प्राप्त झालेले नाही. मराठा कुटुंबासाठी प्रश्नावलींचा फॉर्म ऑनलाईन भरण्यात आला. अन्य प्रवर्गासाठी १० प्रश्नांचा फॉर्म होता. इंटरनेटचा अभाव, शेतमळ्यातील प्रवास अशा सर्व समस्यांना तोंड देत युद्धस्तरावर सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. शिक्षकांनीही निर्धारित वेळेपेक्षा अगोदरच सर्वेक्षण पूर्ण केले. आयोगाला ते सादरही करण्यात आले. मात्र या कामाचे मानधन अजूनही जमा करण्यात आलेले नाही. सर्वेक्षणासाठी मानधनाची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली होती. मराठा कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी १०० रुपये, तर इतरांच्या सर्वेक्षणासाठी १० रुपये मानधन होते. सर्वेक्षण पूर्ण होऊन एक वर्ष झाले आहेत, पण मानधनाची अद्याप प्रतीक्षाच आहे. मानधनासाठी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी शासन कार्यालयाकडे अनुदानाची मागणी साठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. तेथून प्राप्त होताच शिक्षकांच्या खात्यांवर त्वरित जमा केले जाईल.
त्यामुळे या प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालून प्रगणकांना त्यांचे मानधन त्वरित मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, आत्माराम महाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}