अखेर राकॉ शरदपवार गटातर्फे दिलीप खोडपे सरांना जामनेर मधून उमेदवारी जाहिर . गिरीश भाऊ विरुद्ध खोडपे सर सरळ लढत
अखेर राकॉ शरदपवार गटातर्फे दिलीप खोडपे सरांना जामनेर मधून उमेदवारी जाहिर .
गिरीश भाऊ विरुद्ध खोडपे सर सरळ लढत
जळगाव प्रहार — वृषभ इंगळे
जामनेर – अखेरीस जामनेर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटातर्फे आज अधिकृत उमेदवारी दिलिप खोडपे सर यांना जाहिर करण्यात आली आहे .
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ४५ उमेदवारांचे नावांची घोषणा केली .
त्यामुळे जामनेर मतदार संघामध्ये भाजपा व महायुतीचे उमेदवार नामदार गिरीश भाऊ महाजन विरुद्ध राकॉ शरदपवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे .
या आधिच जळगाव प्रहार ने राकॉ शरदपवार गट भाजपा चे मुरब्बी नेता गळाला लावून त्यांना उमेदवारी देणार असल्याचे वृत्त याआधीच प्रसिद्ध केले होते , त्याला अखेर शिक्का मोर्तब झाला आहे .
तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपा व राकॉ पक्ष तर्फे जोरदार कार्यकर्ते मेळावे , मतदारांशी जनसंपर्क यावर भर दिला जात आहे .
राजकीय वातावरण निर्मिती केली जात आहे .
मतदार कुणाच्या बाजुने आपला कौल देणार हे निकाल अंती समजणार आहेच .