Blog
ऐतिहासिक शपथविधीची जय्यत तयारी ! – ना. गिरीश भाऊ महाजन यांनी घेतला आढावा..
ऐतिहासिक शपथविधीची जय्यत तयारी !
वृषभ इंगळे –
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला दिलेला प्रचंड जनादेश स्वीकारून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी महायुती सज्ज आहे…
5 डिसेंबर रोजी महायुती भव्य शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून सरकार स्थापन करत असून, आझाद मैदान येथे नियोजित या शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रविण दरेकर, आ. संजय शिरसाट, आ. गुलाबराव पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. धनंजय मुंडे ,आ. अनिल पाटील उपस्थित होते.