शेतकऱ्यांच्या अडचणीचे निरसण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

जिल्ह्यात खरीप हंगाम 2024 सुरु झाला असून यामध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व विक्रेते यांच्या क्षेत्रीयस्तरावरील अडचणी व तक्रारींचे वेळेत निराकरण होणे गरजेचे आहे. तसेच कृषि निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी, त्यांचे उत्पादन, वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे. याबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती कु.मु. तडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9834684620, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239054 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार saojalgaon@gmail.com वर सुद्धा ईमेल द्वारे पाठवता/नोंदवता येणार आहे.

जिल्हास्तरावर बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्यासंबंधी तक्रार निवारण कक्षात विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव, संतोष भावसार, वरिष्ठ लिपीक, समाधान देवरे कृषि सहाय्यक या अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेही श्री. तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Jalgaonprahar

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.

Site Links

Follow Us

© 2026. jalgaonprahar.com | All Rights Reserved