प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव दि.:- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या शिक्षण कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज () https://awards.gov.in) या संकेतस्थळ मार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्थ, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. असे आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे -1 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Jalgaonprahar

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.

Site Links

Follow Us

© 2026. jalgaonprahar.com | All Rights Reserved