कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

कृषी सेवक | १९ मे २०२४ | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यवसायिक (FBOs) तसेच फळे पिकविणाऱ्या केंद्रांचे चालक यांना, विशेषत: आंब्याच्या हंगामात, फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी लावण्याचे कडक निर्देश दिले आहेत. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे

सद्यस्थितीत आंब्याचा हंगाम चालू असून विविध प्रकारच्या आंब्यांनी बाजार भरला आहे. त्यामुळे कृत्रिम आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे ओळखणे ग्राहकांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधित व्यापारी, विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. एफएसएसएआयने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, 2006 आणि त्यानुसार बनवलेल्या नियम आणि विनियमांच्या तरतुदींनुसार अशा बेकायदेशीर पद्धतींमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे सुचवले आहे.

फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर अन्न सुरक्षा आणि मानके (विक्रीवर प्रतिबंध आणि निर्बंध) विनियम, 2011 च्या नियमन 2.3.5 अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. एफएसएसएआयने फळे पिकवण्यासाठी सुरक्षित पर्याय म्हणून इथिलीन वायूचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. इथिलीन वायूचा वापर पीक, विविधता आणि परिपक्वता यावर अवलंबून असून 100 पीपीएम (100 μl/L) पर्यंत केला जाऊ शकतो. याशिवाय, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीने (CIB आणि RC) आंबा आणि इतर फळे एकसमान पिकवण्यासाठी इथेफॉन 39% SL ला मान्यता दिली आहे.

आंब्यासारखी फळे पिकवण्यासाठी वापरले जाणारे कॅल्शियम कार्बाइड वातावरणात ॲसिटिलीन वायू सोडते. ॲसिटिलीनमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे हानिकारक अंश असतात. या पदार्थांमुळे चक्कर येणे, तहान लागणे, चिडचिड, अशक्तपणा, गिळायला त्रास होणे, उलट्या होणे आणि त्वचेवर फोड येणे यासारख्या गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. शिवाय, ऍसिटिलीन वायू, तो हाताळणाऱ्यांसाठी देखील तितकाच घातक आहे. कॅल्शियम कार्बाइड वापरताना ते फळांच्या थेट संपर्कात येण्याची तसेच आर्सेनिक आणि फॉस्फरसचे अंश फळांवर शिल्लक राहण्याची शक्यता असते.

 

मार्गदर्शक सूचना

 

एफएसएसएआयने “फळे कृत्रिमरित्या पिकवण्याची पद्धत – इथिलीन वायु, फळे पिकवण्याचा एक सुरक्षित पर्याय” या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. या प्रक्रियेचे अनुसरण करून फळे कृत्रिमरीत्या पिकवावीत, अशी सूचना दिली आहे. तसेच कॅल्शियम कार्बाइडचा वापर किंवा फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी पिकवणारे घटक वापरण्याची कोणतीही चुकीची प्रथा ग्राहकांच्या निदर्शनास आल्यास, अशा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jalgaonprahar

Writer & Blogger

Previous Post
Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या वृत्तपत्र आणि वेबसाइटवर आम्ही आमच्या वापरकर्त्यांना ताज्या राजकीय बातम्या, सरकारी धोरणे आणि राज्यस्तरीय बातम्यांबद्दल अपडेट ठेवतो. आमचे वाचक निष्पक्ष तथ्य-आधारित अहवालासह सर्व वर्तमान घटनांवर निष्पक्ष भाष्य अनुभवतात.

Site Links

Follow Us

© 2026. jalgaonprahar.com | All Rights Reserved