येवती गुप ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

बोदवड – श्री सतीश बावस्कर –
*आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येवती येथील 6 सदस्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश*
मुक्ताईनगर:- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या संघटनवाढीला आणखी एक मोठे बळ मिळाले असून, येवती. ता. बोदवड येथील ग्रामपंचायतीतील तब्बल 6 सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. चंद्रकांत भाऊ पाटील साहेब यांच्या नेतृत्वात तसेच प्रा. हितेश दादा पाटील यांच्या कार्यपद्धतीत सुरू असलेल्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासाभिमुख कार्यावर विश्वास व्यक्त करत येवती ग्रामपंचायतीतील सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
आमदार चंद्रकांत पाटील साहेब यांच्या सक्षम नेतृत्वातून मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. येवती ग्रामपंचायतीतील 6 सदस्यांचा हा पक्षप्रवेश आमदार चंद्रकांत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर आणि प्रा. हितेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर व्यक्त झालेला विश्वास मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे येवती परिसरात शिवसेनेच्या संघटनेला मोठी चालना मिळाली असून, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद आणखी भक्कम झाली आहे.
शिवसेनेत प्रवेश करणारे येवती ग्रामपंचायतीचे 6 सदस्य
१. शुभम गणेश पाटील
२. सौ. कविता सागर शेजोळे
३. शे.शमीनाबी.शे.अशपाक
४. फारुख नूर खान
५. सौ.केसरबाई शिवदास भिल
६. सौ.संगम दीपक म्हसाने
या पक्षप्रवेशावेळी येवती ग्रामपंचायत उपसरपंच दिनेश माळी, ग्रामपंचात सदस्य गणेश सोनोवणे, ग्रामपंचायत सदस्य आशिष सोनोवणे, डॉ. आनंद माळी, शेख अशपाक शेख हाफिस, मधू भाऊ शेजोळे हे उपस्थित होते.
तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख छोटू भाऊ भोई, जिल्हासंघटक सुनील भाऊ पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज भाऊ राणे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर भाई खान, राजेंद्र भाऊ वानखेडे, नगराध्यक्ष दिनेश माळी, नगरसेवक सईद दादा बागवान, नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक जफर शेख तसेच पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व सदस्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी येवतीत शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी काळात संघटन विस्तारासाठी अत्यंत मिळणार नवी दिशा देणार असल्याचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सांगितले.


