Blog

जळगावच्या जलसंपदा विभागातील अभियंता विनोद लिला प्रकाश पाटील यांचा गौरव

जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या अभियंत्याचा उल्लेखनीय कार्याचा सन्मान; भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्कार प्रदान

 

जळगावच्या जलसंपदा विभागातील अभियंता विनोद लिला प्रकाश पाटील यांचा गौरव

जामनेर तालुक्यातील रहिवासी असलेल्या अभियंत्याचा उल्लेखनीय कार्याचा सन्मान; भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्कार प्रदान

 

जळगाव : अभियंता दिनानिमित्त भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ जळगाव जिल्हा शासकीय अभियंता सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव यांच्या वतीने जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंता इंजि. श्री. विनोद लिला प्रकाश पाटील यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

इंजि. विनोद लिला प्रकाश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रहिवासी असून, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

अभियंता क्षेत्रातील उल्लेखनीय वाटचाल

प्राप्त गौरवपत्रातील माहितीनुसार, इंजि. पाटील यांनी १ डिसेंबर १९७८ रोजी जन्म घेतला असून, सन २००३ मध्ये बी.ई. (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जलसंपदा क्षेत्रात कार्य करण्यास सुरुवात केली.

सन २००४ ते २००७ या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद, नाशिक येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्य केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन ते सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून निवडले गेले.

सन २००७ ते २०१० या कालावधीत इटियाडोह प्रकल्प, जि. गोंदिया येथे कार्यरत राहून त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २००७ उत्तीर्ण होऊन सहाय्यक अभियंता श्रेणी-१ म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

जलसंपदा प्रकल्पांत महत्त्वपूर्ण योगदान

गौरवपत्रातील माहितीनुसार, सन २०११ ते २०१५ या कालावधीत त्यांनी धुळे अंतर्गत जामखेडी मध्यम प्रकल्प, ता. साक्री येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्य केले. तसेच सन २०१५ ते २०२३ वाघुर प्रकल्प येथे काम केले सन २०२३ मध्ये त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली.

सध्या ते गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात विविध जलसंपदा प्रकल्पांशी संबंधित कामे, सिंचन व्यवस्था आणि पाणी वितरण प्रणालीच्या विकासात त्यांनी योगदान दिल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.

शेतकरी हितासाठी कार्य

अभियंता विनोद पाटील यांनी जलसंपदा क्षेत्रात कार्य करताना शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे, पाणी वितरण प्रणालीची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे आणि जलसंपदा प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकरी हित साधण्यावर भर दिल्याचे गौरवपत्रात नमूद आहे.

वाघूर धरण प्रकल्प, जळगाव येथील कार्यकाळात वाघूर उपसा योजना, जळगाव, जामनेर व गारखेडा शाखांचे गुरुत्वीय नलिकाद्वारे वितरण प्रणाली तसेच गाडगाव व धिवरेखेडा येथील पंपगृहांचे काम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा उल्लेख गौरवपत्रात करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करून त्यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून निवडले गेल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ ‘उत्कृष्ट अभियंता’ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अभियंता दिनी सन्मान; पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव

१५ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव येथे हा गौरव करण्यात आला. अभियंता विनोद प्रकाश पाटील यांच्या कार्याचा सन्मान झाल्याने सहकारी, मित्रपरिवार आणि जामनेर तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

श्री व्ही डी पाटील साहेब ,सा बां विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर डी पाटील , श्री पाटील , हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}