ग्रामीण
नौटंकीबाज जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध..!

नौटंकीबाज जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध..!
जामनेर –रा.का.पा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडलाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्ष जामनेर तालुक्याच्या वतीने जामनेर येथील नगरपालिका समोरील राजमाता जिजाऊ चौक येथे जितेंद्र आव्हाडचा पुतळा जाळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व आव्हाड यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी याप्रसंगी केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते !



