Blog

श्री. विजय पाटील साहेब यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंतापदी पदोन्नती

​श्री. विजय पाटील साहेब यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंतापदी पदोन्नती

​जळगाव:

नाशिक येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (ग्रामविकास विभाग) चे अधीक्षक अभियंता श्री. विजय पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक बांधकाम (सा. बां.) विभागाच्या मुख्य अभियंतापदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, श्री. चव्हाण यांनी मुख्य अभियंता पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागी आता श्री. विजय पाटील पदभार सांभाळणार आहेत.

​कारकिर्दीचा आलेख:

​श्री. विजय पाटील यांनी यापूर्वी जळगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (ग्रामविकास विभाग) मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.

​तेथून त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती होऊन त्यांना नाशिक येथील आदिवासी विभागात नियुक्ती देण्यात आली होती.

​त्यानंतर त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाशिक विभागात बदली झाली होती.

​आता पुन्हा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.

​कार्यक्षम व पारदर्शी अधिकारी:

श्री. विजय पाटील यांची विभागात एक सक्षम, कार्यक्षम, प्रामाणिक आणि पारदर्शी अधिकारी म्हणून ख्याती आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले श्री. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे जावई आहेत.

​आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे ते छत्रपती संभाजीनगर येथेही आपल्या कामाचा मोठा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}