पी. एस. औटी साहेब यांची ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’च्या सचिवपदी नियुक्ती

पी. एस. औटी साहेब यांची ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’च्या सचिवपदी नियुक्ती
जळगाव: मच्छिन्द्र इंगळे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. पी. एस. औटी साहेब यांची मुंबई येथील मंत्रालयात ग्रामविकास विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनांक ३१ जुलै रोजी तत्कालीन सचिव श्री. चिखलीकर हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेवर आता श्री. औटी यांना पदोन्नती (प्रमोशन) मिळाली असून, ते लवकरच या नव्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख:
यापूर्वी नाशिक येथे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना श्री. औटी साहेब यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि शिस्तबद्ध कामकाजाने संपूर्ण विभागात आपली वेगळी छाप पाडली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक प्रलंबित कामे यशस्वीरीत्या मार्गी लावली आहेत. विभागात त्यांची ‘प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी’ अशी ख्याती आहे.
अल्प कालावधीत उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा:
श्री. औटी यांच्या शासकीय सेवेचा कालावधी आता केवळ पाच ते सहा महिन्यांचा उरला आहे. याच ज्येष्ठतेनुसार त्यांना सचिवपदी बढती मिळाली आहे. या अल्प कालावधीतही ते मुंबई मंत्रालयातील सचिव, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई. (रिक्त पदी) आपल्या कामाचा ठसा नक्कीच उमटवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
