Blog

जाणीव पुरस्कार सोहळा रविवारी आयोजित

 

 

जाणीव पुरस्कार सोहळा रविवारी आयोजित
अहमदनगर : जाणीव सांस्कृतिक अभियान अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार सोहळा 2024-25 रविवार, दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा माळीवाडा सभागृह, टोपडी कॅन्टीन मागे, अहमदनगर येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात समाजातील उल्लेखनीय कार्यासाठी श्री. जगन्नाथ चव्हाण आणि सौ. रजनी ताई जगन्नाथ चव्हाण तसेच मुख्य अभियंता राजेश मोरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवर मा. सुभाष वाटे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य खांदेव चितळे भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. एन. बी. धुमाळ तसेच मा. मेधाताई काळे उपस्थित राहणार आहेत.
प्रा. डॉ. सौ. मंजुषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}