ग्रामीण

मुख्य सचिवांकडे दाखल तक्रारीची दखल* *ग्रामविकास विभागाकडून विभागीय आयुक्त, नाशिक यांना चौकशीचे आदेश

*मुख्य सचिवांकडे दाखल तक्रारीची दखल*

*ग्रामविकास विभागाकडून विभागीय आयुक्त, नाशिक यांना चौकशीचे आदेश*

जळगाव: माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी *उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद जळगाव* यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. मुख्य सचिवांकडे दाखल करण्यात आलेली तक्रार ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाने विभागीय आयुक्त, नाशिक यांना सदर प्रकरणाची चौकशी करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रारीमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून दैनंदिनी मंजुरीशिवाय प्रवास भत्ता घेण्यात आल्याच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास यथोचित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही ग्रामविकास विभागाने दिले आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदार भगवान चौधरी यांना कळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“तक्रारीची शासन स्तरावर दखल घेऊन विभागीय आयुक्तांकडे चौकशीसाठी पाठविण्यात आल्याने सत्य समोर येईल,” अशी प्रतिक्रिया तक्रारदार भगवान चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}