माणसातील माणुसकीचा झरा – नामदार गिरीश भाऊ महाजन

माणसातील माणुसकीचा झरा – नामदार गिरीश भाऊ महाजन
आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे
जामनेर — नांदुरा येथील श्री. गजाननराव मानकर हे गावातून रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या बाजूला येऊन एक गाडी थांबली. गाडीतून कोणीतरी त्यांना आवाज दिला, त्यांनी वळून बघितलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक उदंड व्यक्तिमत्व त्यांना आवाज देऊन जवळ बोलावतय यावर काही क्षण त्यांचा विश्वासच बसला नाही. पुन्हा एकदा गाडीतून आवाज आल्यानंतर मात्र त्यांची खात्री झाली, ते गाडीजवळ गेले… आवाज देणारे होते महाराष्ट्राचे “संकटमोचक” ना.श्री. गिरीषभाऊ महाजन…
काही दिवसांपूर्वी श्री. गजानन मानकर यांचे लिव्हर ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन झाले, त्यावेळी ते ना. गिरीषभाऊ महाजन यांना भेटले होते. तेवढी एकच भेट गिरीषभाऊंना कायमचं नातं जुळवण्यासाठी पुरेशी ठरली, म्हणूनच आज गजानन मानकर लांबून दिसताच भाऊंनी आवर्जून गाडी थांबवून गजाननराव मानकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली ! माणसातील माणुसकीचा झरा तो गिरीश भाऊ असे आपसुक बोल गजाननराव यांच्या मुखातून निघाले .
गिरीश भाऊ यांचे एक वैशीष्ठ आहे जो कोणी त्यांच्या संपर्कात येतो त्याला ते विसरत नाही हे विशेष .



