Blog

येवतीतील अनाथ मुलींच्या मदतीसाठी एक लाखांचा धनादेश सुपूर्द!

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून स्व. काशिनाथ बावस्कर यांच्या मुलींना आर्थिक मदत

 

सतीश बावस्कर येवती – 

येवती, ता. बोदवड : येवती येथील स्व. काशिनाथ मारुती बावस्कर यांच्या निधनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या त्यांच्या मुलींच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. राज्याचे मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून बावस्कर कुटुंबातील मुलींना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.

 

जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष मा. चंद्रकांत अण्णा बाविस्कर, माजी पंचायत समिती सभापती श्री. नवलसिंग पाटील, बोदवड भाजपा तालुकाध्यक्ष श्री अमोल देशमुख,जळगाव जिल्हा पूर्व युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री. प्रफुल्ल महाजन आणि बोदवड तालुकाध्यक्ष श्री. अमोल देशमुख यांच्या हस्ते हा धनादेश मुलींकडे सुपूर्द करण्यात आला.

 

स्व. काशिनाथ मारुती बावस्कर यांच्या मुलींच्या भविष्याची काळजी लक्षात घेऊन ना. गिरीशभाऊ महाजन यांनी येवती येथील भाजप कार्यकर्त्यांना आवश्यक मदत व सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः भाजपचे तालुका उपाध्यक्ष श्री. सुनील भाऊ माळी आणि तालुका उपाध्यक्ष श्री. उमेश भाऊ पाटील यांना मुलींना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्व कार्यालयीन बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले.

 

या वेळी कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री. विनोदजी डांगे, रामदास भाऊ श्रावणे, समाधान लोखंडे, सतिष बावस्कर, जितू खैरनार, विजय ठाकूर, विश्वनाथ बावस्कर, अमित पठाण, धर्मा खैरनार, प्रल्हाद ठाकूर आणि दीपक बावस्कर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अनाथ मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे आल्याने परिसरातून या उपक्रमाची चर्चा होत आहे. मुलींना पुढील काळात शिक्षणासाठी आणि उदरनिर्वाहासाठी आवश्यक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}