Blog

टपरी वरचा आमदार ही छाफ आज ही मंत्री गिरीश भाऊ महाजन जपून , सर्व सामान्य चहा टपरी धारका कडे जावून केली विचारपुस 

 

 

मच्छिंद्र इंगळे

जामनेर — जामनेर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार तथा मंत्री गिरीश भाऊ महाजन हे त्यांची टपरी वरचा आमदार ही जुनी ओळख आजही त्यांची जपून असल्याचे चित्र आहे .

जामनेर विधानसभा क्षेत्रातील असो की कुठलाही बाहेर गावाचा मनुष्य याचे कोणतेही काम , अडी अडचणी , समस्या तात्काळ ऑन दि स्पॉट मिटवण्या साठी नेहमीच गिरीश भाऊ महाजन तत्पर असतात .

गिरीश भाऊ ना भेटण्यासाठी कोणत्याच

मधल्या ( दलालाची ) कधीही आवश्यकता नसते ,

डायरेक्ट थेट गिरीश भाऊंची भेट आणि काम ओके , अशी भाऊंची आज पर्यंतची कार्य पद्धती राहिली आहे .

रस्त्याने जातांना असो की कुठल्याही कार्यक्रमात का बिजी असेना आपली काम , समस्या घेवून येणारे श्रीमंत , गरिब का असेना ,अश्या लोकांची कामे तात्काळ फत्ते करणे , दुःखी चेहरा घेवून आलेला व्यक्तीला आनंदानेच हसऱ्या चेहऱ्यानेच भाऊ ची भेट घेतल्या नंतर जातांनाच क्षण सांगून जातात .

आजचा प्रसंग ही तसाच होता .

जामनेर शास्त्रीनगर परिसरात मंत्री गिरीश महाजन कामा निमित्त आले असता , परतीच्या प्रवास दरम्यान रस्त्यातच छोटीशी चहा टपरी चालवणारा श्रीराम याने भाऊंना आवाज दिला ,

लागलीच गिरीश भाऊ यांनी गाडीतून खाली उतरून चहाच्या टपरीवर भेट देवून त्याची चौकशी केली .

मंत्री महोदयांनी आपल्या छोटीशी टपरीवर भेट दिली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता .

गिरीश भाऊ हे सर्व सामान्य , कार्यकर्त्याला नेहमीच जीवा भावाची आपली संपत्ती मानतात , व हे त्यांनी अनेक वेळा आपल्या भाषणातूनही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत . सात वेळा जामनेर मतदार संघातून आमदार म्हणून निवडूण आल्या नंतरही 

तसेच मंत्री झाल्या नंतरही आजही गिरीश भाऊ टपरीवरचे आमदारच म्हणून ओळख कायम टिकवून आहेत हे विशेष .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}