रामकुंड परिसराच्या विकासकामांची ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून पाहणी – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

वृषभ इंगळे –
रामकुंड परिसराच्या विकासकामांची ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून पाहणी – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
नाशिक येथील पवित्र रामकुंड आणि परिसरात येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांची आज ना. गिरीशभाऊ महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
रामकुंड परिसरात भाविकांसाठी सोयीसुविधा, घाटांचे सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना सध्या गती देण्यात येत असून, ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
यावेळी त्यांनी सर्व कामांचा सविस्तर आढावा घेत, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यावर भर दिला.
रामकुंड परिसराचा सर्वांगीण विकास साधून नाशिक शहराची ओळख अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ना. गिरीशभाऊ महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.



