श्री. विजय पाटील साहेब यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंतापदी पदोन्नती
श्री. विजय पाटील साहेब यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंतापदी पदोन्नती
जळगाव:
नाशिक येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (ग्रामविकास विभाग) चे अधीक्षक अभियंता श्री. विजय पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक बांधकाम (सा. बां.) विभागाच्या मुख्य अभियंतापदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. चव्हाण यांनी मुख्य अभियंता पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या जागी आता श्री. विजय पाटील पदभार सांभाळणार आहेत.
कारकिर्दीचा आलेख:
श्री. विजय पाटील यांनी यापूर्वी जळगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (ग्रामविकास विभाग) मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
तेथून त्यांची अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती होऊन त्यांना नाशिक येथील आदिवासी विभागात नियुक्ती देण्यात आली होती.
त्यानंतर त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाशिक विभागात बदली झाली होती.
आता पुन्हा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे.
कार्यक्षम व पारदर्शी अधिकारी:
श्री. विजय पाटील यांची विभागात एक सक्षम, कार्यक्षम, प्रामाणिक आणि पारदर्शी अधिकारी म्हणून ख्याती आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले श्री. पाटील हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे जावई आहेत.
आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे ते छत्रपती संभाजीनगर येथेही आपल्या कामाचा मोठा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
