जामनेर पंचायत समितीत खळबळ: ३६ दिवसांच्या सुट्टीनंतर कर्तव्यदक्ष बीडीओ श्रीकृष्ण इंगळे रुजू; ‘त्या’ २७ कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष!
आता सुट्टीवरून परतलेले 'सिंघम' अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब या गैरहजर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरळ करणार की त्यांना अभय मिळणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळेल. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

जामनेर पंचायत समितीत खळबळ: ३६ दिवसांच्या सुट्टीनंतर कर्तव्यदक्ष बीडीओ श्रीकृष्ण इंगळे रुजू; ‘त्या’ २७ कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष!
जामनेर (प्रतिनिधी): जामनेर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी (BDO) श्री. श्रीकृष्ण इंगळे साहेब तब्बल ३६ दिवसांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. त्यांच्या पुनरागमनमुळे पंचायत समिती वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा कसा होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
’आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाईन तक्रारी आणि दैनिक जळगाव प्रहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने जामनेर पंचायत समिती अंतर्गत एक खळबळजनक चौकशी अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, तालुक्यात एकूण ७६ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत (यामध्ये ७२ नियमित आणि ०४ कंत्राटी कर्मचारी आहेत).
चौकशी अहवालातील धक्कादायक आकडेवारी:
नियमित दैनंदिनी सादर करणारे प्रामाणिक अधिकारी: फक्त १२
विलंबाने दैनंदिनी सादर करणारे अधिकारी: ३७ (यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे).
दैनंदिनी सादरच न करणारे कामचुकार अधिकारी: तब्बल २७!
विशेष म्हणजे, या सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना शासनाकडून कायम प्रवासभत्ता दिला जातो. असे असतानाही जानेवारी २०२६ पासून ज्या अधिकाऱ्यांनी आपली दैनंदिनी सादर केलेली नाही, त्यांना वेतन देयकात कायम प्रवासभत्ता देण्यात आलेला नाही, अशी माहिती अहवालातून समोर आली आहे.
इंगळे साहेबांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष!
श्रीकृष्ण इंगळे साहेब हे आपल्या कडक शिस्तीसाठी आणि ‘कर्तव्यदक्ष अधिकारी’ म्हणून ओळखले जातात. आता ते सुट्टीवरून परत आल्यामुळे, या संपूर्ण प्रकरणाकडे ते कसे पाहतात आणि काय पावले उचलतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
तालुक्यात एकच चर्चा रंगत आहे की, कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले गट विकास अधिकारी साहेब या २७ कामचुकार ग्रामविकास अधिकाऱ्यांवर तसेच विलंबाने काम करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारणार का? तसेच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून वसुली करण्याबाबत जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे रीतसर टिपणी (Note) ठेवून कडक वसुलीची मागणी करणार का?
आता सुट्टीवरून परतलेले ‘सिंघम’ अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब या गैरहजर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरळ करणार की त्यांना अभय मिळणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळेल. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.



