आर्थिक
पंचायत समिती जामनेर येथील गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित दैनिक जळगाव प्रहार प्रतिनिधी वृषभ इंगळे त्याच प्रमाणे दादाराव वाघ संपादक MJN NEWS यांनी वाढदिवसानिमित दिल्या शुभेच्छा…

जामनेर ( प्रतिनिधी ) : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब यांची पंचायत समितीमध्ये भेट घेऊन त्यांना, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
जामनेर पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यापासून त्यांचा कामाचा सपाटा, रोजची उपस्थिती, सर्व सरपंचांच्या समस्येचे निराकरण, अशा सर्व जबाबदाऱ्या अगदी उत्तमरीत्या पार पाडत आहेत, त्यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व सरपंचांचे त्यांच्या वरती असलेले प्रेम वाढलेले आहे, त्यामुळेच जामनेर मध्ये खास वाढदिवसाच्या औचित्य साधून सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचं भरभराटीचे जावो, त्यांच्याकडून अशाच चांगल्या प्रकारे सेवा घडो, अशा गोड शुभेच्छा सर्वांनी दिल्या


