Blog

जामनेर तालुका : कृषीभवन वास्तूचे भूमिपूजन व खरीप आढावा बैठक संपन्न*

*जामनेर तालुका : कृषीभवन वास्तूचे भूमिपूजन व खरीप आढावा बैठक संपन्न*

 

जामनेर तालुक्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासकीय फळ रोपवाटिका जामनेर येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या नवीन कृषीभवन वास्तूचे भूमिपूजन आज मा. ना. गिरीशभाऊ महाजन, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

यानंतर मा ना गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्याची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा श्री जे.के. चव्हाण साहेब, सेवानिवृत्त अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे कार्य कारी अभियंता आर डी पाटील , मा डॉ श्री प्रशांत भोंडे, उपनगराध्यक्ष, नगर पालिका जामनेर, मा. श्री. महेंद्रभाऊ बाविस्कर,नगरसेवक, मा. श्री. रवींद्र महाजन,कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी, मा. श्री व्ही. टी. गुजर,शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र जळगाव, तसेच श्री नानासाहेब आगळे (तहसीलदार, जामनेर) आणि श्री काळे साहेब (गटविकास अधिकारी, पंचायत समिती) यांचेसह तालुक्यातील सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

बैठकीत तालुका कृषी अधिकारी श्री जितेंद्र पाटील यांनी खरीप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला. अध्यक्षीय भाषणात मा. ना. श्री गिरीश महाजन यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, योग्य पीक नियोजन आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना खरीप हंगामाचे सुयोग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंत्री महोदय यांच्या हस्ते कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर, अवजारे तसेच ठिबक सिंचन संचाचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी,अधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}