धरणग्रस्तांचा हक्काचा मायेचा माणूस.. श्री. गोकुळ महाजन साहेब.
वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गोकुळ महाजन यांचे कडे अतिरिक्त अधिक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव या पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे

जामनेर प्रतिनीधी – वृषभ इंगळे
शासकीय सेवेत उच्च पदावर एकदा नोकरी मिळाली की भरपूर पगार , सरकारी गाडी ,बंगला ,नोकर , चाकर असाच सर्वसामान्यांचा विचार असतो . ही नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समज बहुतांशी असाच असतो . परंतु शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर या सोयी सुविधांबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचीही जाण त्यांना होत असते . ही जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून बजावणारे काही मोजकेच अधिकारी आपल्याला शासकीय सेवेत आढळून येतात . त्या अधिकाऱ्यांपैकी श्री . गोकुळ महाजन साहेब यांचा नामोल्लेख करावाच लागेल . नुकतेच वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गोकुळ महाजन यांचे कडे अधिक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव या पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे .
श्री. भदाने साहेब सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर अतिरिक्त अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार त्यांना सोपवण्यात आला आहे.
शासनाने त्यांना दिलेल्या अतिरिक्त अधीक्षक अभियंता पदभारा मुळे त्यांच्या चाहत्यांनी आंनद व्यक्त केला आहे , धरणग्रस्तांच्या जिवाभावाचा माणूस अशी गोकुळ महाजन साहेब यांची ओळख आहे. आपले कार्य कर्तृत्व एकनिष्ठता काम करण्याची हातोटी अविश्रांत मेहनत यामुळे आज त्यांच्या कष्टाचे फळ झाल्याचे दिसत आहे.
शासनाने त्यांना अधीक्षक अभियंता पदभार दिल्याने सर्वत्र आंनद व्यक्त होत आहे. सर्वसामान्य माणसांचा धरणग्रस्तांचा शेतकऱ्यांचा आवाज म्हणजे गोकुळ महाजन साहेब अधिकारी असावेत ते गोकुळ महाजन साहेबांसारखे त्यांना अतिरिक्त अधीक्षक अभियंता पदभार दिल्याने आम्हाला खूप आनंद झाल्याचेही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
तसेच अनेक रखडलेले प्रश्न साहेबांच्या कार्यातून सुटणार असल्याने सर्वत्र आशेचे वातावरण आहे. त्यांची मधूर वाणी, कामाचा गाढा अभ्यास असल्याने श्री. गोकुळ महाजन साहेब लवकरच त्यांची पदोन्नती होत असल्याने कायम स्वरुपी म्हणुन अधीक्षक अभियंता पदाचा पदभार त्यांच्या कडेच येणार असल्याने त्याच प्रमाणे जळगाव जिल्हातील रहिवाशी असल्याने याचा फायदा जिल्हाला नक्कीच होइल.
श्री . व्ही.डी.पाटील साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे मार्गदर्शन व आदर्श घेऊन
श्री . व्ही.डी.पाटील साहेब यांनी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे प्रकल्पाचे काम मार्ग लावले
त्या प्रमाणे जिल्हातील विकास कसा साधता येइल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, श्री.गोकुळ महाजन साहेब यांची अभ्यासु वृत्ती असल्याने नक्कीच जळगाव जिल्हातील प्रश्न सुटतील अशी सर्वांची आशा आहे.
जिल्हातील साहेबांच्या पुढील कार्यास दैनिक जळगाव प्रहार चे संपादक सदाशिव इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.



