ग्रामीण
जामनेर –जामनेरसह जळगाव शहराची तहान भागवणारे वाघुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, ही समाधानकारक बाब आहे. आज हिवरखेडा येथे जाऊन विधिवत वाघुर जलाशयाचे नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक जलपूजन केले. या जलाशयामुळे परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पूर्णपणे मिटला आहे. याप्रसंगी जिप सीओ अंकित , तहसिलदार नाना साहेब आगळे , उपअभियंता पाटील , यांचे सह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते !




