ग्रामीण

सेवेचा वसा आणि मानवतेचा ध्यास — रेड स्वस्तिकची करुणामय चळवळ” – श्री.कैलास जाधव (IAS अधिकारी)*

 

नाशिक | दिव्यांग बांधवांच्या जीवनात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नवसंजीवनी देणारा भव्य कृत्रिम अवयव वितरण समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम रेड स्वस्तिक सोसायटी, नाशिक यांच्या वतीने, कोटक महिंद्रा बँक व भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई यांच्या सहकार्याने दिव्यांग भवन येथे आयोजित करण्यात आला.

 

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. ज्ञानदीप पाटील यांनी प्रार्थना व सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची सुबक मांडणी केली. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत समारंभपूर्वक करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे उद्घाटक IAS अधिकारी श्री. कैलास जाधव यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले की, “सेवेचा वसा आणि मानवतेचा ध्यास घेऊन कार्यरत असलेली रेड स्वस्तिक ही केवळ एक संस्था नसून, ती करुणेची चळवळ आहे.” त्यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण समाजकार्याचे विशेष कौतुक केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेड स्वस्तिकचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.सुरेश कोते होते. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत समाजसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन केले. रेड स्वस्तिक चे Jt.MD श्री.अशोक शिंदे यांनी ‘सेवा, आरोग्य आणि संस्कार’ या विषयावर संस्थेची २५ वर्षांची वाटचाल उलगडून सांगितली.

श्री गुरुजी रुग्णालयाचे श्री. मकरंद धर्माधिकारी यांनी निस्वार्थ सेवाभावाचे महत्त्व स्पष्ट करत, “मी केले” हा भाव नसलेली सेवा हीच खरी सेवा असून असे कार्य रेड स्वस्तिक सातत्याने करत आहे, असे सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील केदार यांनी समाजातील विविध समस्यांची उदाहरणे देत संवेदनशीलतेची गरज अधोरेखित केली.

स्नेहाताई कोकणे यांनी दिव्यांगांना समजून घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन केले.

 

कार्यक्रमात कोटक बँकेचे मॅनेजर दुर्गाप्रसाद देशपांडे, भगवान महावीर विकलांग केंद्राचे नारायण व्यास, FDA चे उपायुक्त प्रदीप पाटील, रेड स्वस्तिकचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भगवान राऊत, रेड स्वस्तिकचे राज्य अध्यक्ष हेमंत गोरे, नारायण क्षीरसागर, जे. बी. पाटील, गोविंदभाऊ घुगे, डॉ. संदीप रॉय, डॉ.विलास पांगारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद खानोरे, डॉ.उल्हास कुटे, योगेश मोरे,माजी DYSP प्रभाकर रायते, विलास सोनवणे, छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास पाटील, चेतनभाई पटेल, भागवत कावले, डॉ. योगेश पगार डॉ.धर्मेंद्र शिंदे, श्री. घोलप, डॉ.प्रशांत भामरे. हर्षाली भोसले, रुपालीताई भगुरे, चारुशीलाताई शिरोडे, मंजिरीताई रत्नपारखी, मोना दीदी यांच्यासह महिला सेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी मनापासून सेवा दिली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल चव्हाण पाटील यांनी केले. त्यांनी या उपक्रमामागील सामाजिक भूमिका, नियोजन व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचा उल्लेख केला.

 

या शिबिरात एकूण ३१२ दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी २६८ लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले. नवजीवनाची अनुभूती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.

दिव्यांग बांधव योगेश वाणी यांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमामुळे आयुष्याला नवी दिशा मिळाल्याची भावना मांडली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी रेड स्वस्तिक नाशिक शाखेचे कार्याध्यक्ष श्री. जे. बी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

हा उपक्रम केवळ साहित्य वितरणाचा नसून, समाजातील वंचित घटकांना स्वाभिमानाने उभे करण्याचा आणि “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेचा जिवंत अनुभव देणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}