हतनूर धरण जलसंधारण तलावाला “रामसर कन्व्हेन्शन” अंतर्गत “रामसर स्थळ” म्हणून घोषित करावे; याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांचेकडे मागणी केली…
हतनूर धरण जलसंधारण तलावाला “रामसर कन्व्हेन्शन” अंतर्गत “रामसर स्थळ” म्हणून घोषित करावे; याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांचेकडे मागणी केली…
जळगाव प्रहार
जळगाव –रावेर_लोकसभा अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील #हतनूर_धरण आणि त्याच्या आसपासचा परिसर त्याच्या अपवादात्मक जैवविविधतेसाठी, विशेषतः अनेक स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी प्रजातींच्या अधिवास म्हणून ओळखला जातो. याची समृद्ध पक्षी विविधतेमुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) आणि वेटलैंड इंटरनॅशनल यांनी त्याला महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता क्षेत्र (IBA) म्हणून मान्यता दिलेली आहे. या प्रदेशाला महत्वपूर्ण मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या जवळीकतेमुळे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे. त्यामुळे “हतनूर धरण जलसंधारण तलाव” परिसराला “रामसर कन्व्हेन्शन” अंतर्गत “रामसर स्थळ” म्हणून घोषित करावे याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांची नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री रक्षा ताई खडसे यांनी भेट घेऊन अशी मागणी केली.
हतनूर धरण जलसंधारण तलाव परिसरात ‘तलवार बदक’, ‘थापट्या बदक’ चिखलपायटे’ ‘करकोचे’, विविध प्रकारचे ‘कुदळे’ पक्षी मोठ्या संख्येने दिसतात. विशेषत्वाने एप्रिल- मे महिन्यादरम्यान या परिसरात ‘फ्लेमिंगो’ पक्ष्यांचे आगमन होते. त्यासोबत ‘स्पूनबिल’ (चमचा), ‘वेस्टर्न रीफ इग्रेट’, दुर्मीळ झालेला ‘मलार्ड’ हे पक्षी दक्षिणेकडून परतीच्या प्रवासाला निघालेले असताना हतनूर जलाशयावर काही दिवस निश्चितपणे थांबतात. याशिवाय जलाशय परिसरात पक्ष्यांच्या विविध प्रजाती प्रजननासाठी देखील येतात.
“हतनूर धरण जलसंधारण तलाव” परिसराचे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता, पर्यावरण मंत्रालय मार्फत हतनूर धरण जलसंधारण तलाव परिसराला “रामसर कन्व्हेन्शन” अंतर्गत “रामसर स्थळ” म्हणून घोषित करण्यात आल्यास न केवळ संरक्षण प्रयत्नांना चालना मिळेल असे नाही तर पर्यटन सुद्धा वाढेल तसेच स्थानिक रोजगारच्या संधी निर्माण होतील. यामुळे अनोख्या जैवविविधतेचे संरक्षण सुनिश्चित करणार नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांच्या आकांक्षा पूर्तीसाठी मदत होईल.