ग्रामीण

पारधी समाज बांधवांना कळविण्यात येते कि आदिवासी पारधी क्रांती संघटना राज्य कार्यकारिणी विस्तार, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी विस्तार करण्यात येणार आहे तरी सर्व पारधी समाज बांधवांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे अशी आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे

*🚩🚩🚩 विनम्र आवाहन🚩🚩🚩*

 

*✊✊एक पारधी🙏लाख पारधी✊✊*

 

*सप्रेम नमस्कार*

 

*पारधी समाज बांधवांना कळविण्यात येते कि आदिवासी पारधी क्रांती संघटना राज्य कार्यकारिणी विस्तार, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी विस्तार करण्यात येणार आहे तरी सर्व पारधी समाज बांधवांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे अशी आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे*

 

*🌹कार्यक्रमाची रूपरेषा वेळ व ठिकाण🌹*

*दि.२२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी*

*सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत*

*ठिकाण. राधा कृष्ण मंगल कार्यालय पांडे चौक पंचमुखी हनुमान रोड जळगाव*

 

 

*आदिवासी पारधी क्रांती संघटनेची पुढील वाटचाल व कार्य पद्धती खालील प्रमाणे 👇👇👇👇👇*

*पारधी तिथे शाखा फलक अनावरण करणे*

 

*समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करणे*

 

*समाजातील अधिकारी कर्मचारी वर्गाचा मेळावा आयोजित करणे*

 

*भगत जोखारे धर्मगुरू यांचा मेळावा आयोजित करणे*

 

*पारधी समाज जनजागृती मेळावे आयोजित करणे*

 

*प्रत्येक गावाची नवीन कार्यकारिणी निवड करणे*

 

*संघटने मार्फत महाराष्ट्र भर संपर्क अभियान राबवुन प्रत्येक पारधी कुटुंबांपर्यंत गाव वाड्या वस्त्या पर्यंत पोहचण्याचा आमचा ध्यास आहे*

 

 

 

*पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांगीण विकासासाठी,पारधी बांधवांवर होत असलेला अन्याय अत्याचार विरोधात नाशिक ते मंत्रालयावर पायी मोर्चा आयोजित करणे आदिवासी पारधी बांधवांना आदिवासी योजनेचा लाभ मिळावा म्हणून आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक या कार्यालया समोर उपोषण करणे, महाराष्ट्रातील सर्व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोर उपोषण करणे गाव तालुका जिल्हा पातळीवरील प्रलंबित प्रश्न व इत्यादी समस्या बाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालयावर मोर्चे आंदोलने उपोषण करणे*

 

*आदिवासी पारधी व पारधी समाजातील सर्व पोट जमाती यांना नम्र विनंती करण्यात येते की गेल्या ७५ वर्षांपासून पारधी समाज राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या इतर आदिवासी समाजाच्या तुलनेत खुप मागे राहीला आहे इतर आदिवासी समाजाचे लोक मंत्री, खासदार आमदार व इत्यादी पदावर कार्यरत आहे म्हणून इतर आदिवासींचा विकास झाला आहे, स्वतंत्र भारतात आपल्या पारधी समाजाचा खासदार किंवा आमदार होऊ शकला नाही त्यामुळे आपल्या समाजाच्या विविध समस्या बाबत संसदेत व विधानसभेत कोणीही प्रश्न मांडले गेले नाहीत आपल्या पारधी समाजाला कोणीही वाली नाही म्हणून तमाम पारधी समाज बांधवांना कळकळीची विनंती करण्यात येते की जो पर्यंत आपण रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण मोर्चे काढत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही व यामुळे राज्यकर्ते व प्रशासन दखल घेणार नाही अन्यथा अजून ७५ वर्षं होऊन जातील तरी आपला विचार होणार नाही म्हणून सर्व समाज बांधवांनी एकजूट होऊन महाराष्ट्रात पारधी समाजाचे अस्तित्व तयार करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चे आंदोलने उपोषणात सहभागी व्हावे तेव्हाच खऱ्या अर्थाने पारधी समाजाचे एकजुटीचे दर्शन होईल*

 

*प्रत्येक पारधी बांधवांनी समाजाच्या न्याय हक्कासाठी तन मन धनानी आपल्या जीवनातील थोडा वेळ रस्त्यावर उतरुन आंदोलन मोर्चे उपोषणात सहभागी झाले तर पारधी समाजात परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही म्हणून एक दिवस पारधी समाजासाठी एकजूट व्हा अशी सर्व पारधी समाज बांधवांना कळकळीची हात जोडून नम्र विनंती*

 

*पारधी समाजाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे*

 

*आदिवासी पारधी विकास महामंडळ स्थापन करून पारधी पॅकेज साठी ५०० कोटींची तरतूद करण्यात यावी*

 

*पारधी व पारधी समाजातील सर्व पोट जमातीचा कुटुंब सर्वेक्षण करण्यात यावा*

 

*आदिवासी विकास विभागातील योजनांचा पारधी बांधवांना लाभ मिळावा*

 

*पारधी समाजातील माता भगिनीवर यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार थांबवा*

 

*समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय सेवेत संधी मिळावी यासाठी विशेष भरती मोहीम राबवावी*

 

*पारधी समाजातील भुमीहीन असलेल्या समाज बांधवांना चार एकर बागायती जमीन किंवा आठ एकर कोरडवाहू जमीन देण्यात यावी*

 

*पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के आदिवासी आश्रमशाळा मुंबई कोकण विभाग, खान्देश,विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, इत्यादी विभागात प्रत्येकी दोन दोन आदिवासी आश्रमशाळा देण्यात यावी*

 

*आदिवासी जमातीच्या सुचित कोणत्याही बिगर आदिवासी जातीचा समावेश करु नये,*

 

*पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांना रिक्षा व चार चाकी वाहन देण्यात यावे*

 

*पारधी समाजातील शेतकरी यांना ट्रॅक्टर व इत्यादी शेती औजारे शंभर टक्के अनुदानावर देण्यात यावी*

 

*पारधी समाजाचे कुलदैवत आदिशक्ती सप्तशृंगी गडावर समाज बांधव मातेचे दर्शन घेण्यासाठी व आपल्या रुढी परंपरा व विविध कार्यक्रमा निमित्त गडावर सतत येत असतो त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नाही म्हणून गडावर भव्य असे सभागृह बांधण्यात यावे*

 

*श्री क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखन माऊली देवी संस्थान अवधा (खुर्द) ता नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमा निमित्त लाखो समाज बांधव यात्रेला येत असतात म्हणून अवधा (खुर्द) येथे भव्य असे सभागृह व इतर सोयी सुविधा निर्माण व्हावे*

 

*वनजमिनींचे पट्टे पारधी कुटुंबांना मिळावे*

 

*पारधी बांधवांना गावगुंडा कडून होत असलेला त्रास थांबवा*

 

*पारधी कुटुंबांसाठी महाराष्ट्रातील सर्व शहरात हक्काचे घर देऊन पुनर्वसन करण्यात यावे*

 

*पारधी समाजातील भगत,जोखारे व धर्मगुरू यांना शिख समाजा प्रमाणे शासकीय नोकरीत असताना पगडी काढण्याची सक्ती करु नये*

 

*पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्राधान्य क्रमाणे प्रवेश देण्यात यावा*

 

*आदिवासी विकास विभागाकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोठ्या योजना राबवुन तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा*

 

*आपलाच*

*श्री मुकेश भाऊ साळुंके*

*संस्थापक अध्यक्ष आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश,मो 9011400712*

 

*श्री दिपकभाऊ खांदे (सुर्यवंशी)*

*राज्य महासचिव*

*आदिवासी पारधी क्रांती संघटना महा प्रदेश*

*7620243865*

 

*श्री विनोद भाऊ साळुंके (खान्देश अध्यक्ष)*

*8888035890*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}