शिवण नदीवर “स्वच्छता हीच सेवा” उपक्रम आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शुभारंभ.
शिवण नदीवर “स्वच्छता हीच सेवा” उपक्रम आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते शुभारंभ.
नंदुरबार जिल्ह्यातील हजारो सार्वजनिक मंडळ, घरगुती गणपती बाप्पा तसेच गणेशभक्त मोठ्या भक्तिभावाने शिवन नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांपैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष अस्ताव्यस्त दिसते. नदी परिसरात दृश्य उदासीनतेचे असते. त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये आणि नदी काठावरील स्वच्छ राहावा म्हणून जिल्हा परिषद नंदुरबार, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत विविध खामगाव, विरचक, ढेकवद, टोकरतलाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात एम के डी एज्युकेशन कॅम्पस नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेचे पूजन करून भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता ही सेवा या बद्दल मार्गदर्शन केले तसेच आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या वतीने सर्व उपस्थित विद्यार्थी व गुरुजनांना प्रतिज्ञा म्हणून शपथ दिली. तसेच आपले घर आपली शाळा आपला परिसर हा नेहमी आपण स्वच्छ ठेवून देशाच्या विकासामध्ये सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले. ‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण नंदुरबार जिल्ह्यातील १८ ते २ ऑक्टोबर पर्यंत चालू राहणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ या जन आंदोलनासाठी सर्वांनी पूर्ण, निष्ठापूर्वक समर्पण करण्याची शपथ, आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिली आहे.
त्यांनी आज जिल्हा परिषदेच्या वतीने शिवण नदी पात्रात आयोजित स्वच्छता ही सेवा पंधरवडाच्या शुभारंभ प्रसंगी शपथ देताना बोलत होते.
यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावीत म्हणाले, प्रत्येकाने अंतकरणातून हा दृढ संकल्प करून, स्वतःला एक स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसाठी स्वच्छता ही सेवा’ या जन आंदोलनासाठी सर्वांनी पूर्ण, निष्ठापूर्वक समर्पण करावे. प्रत्येकाने आपले घर, विद्यालय, कॉलेज, आरोग्य केंद्र, रेल्वे आणि बस स्टेशन, तलाव आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच स्वतः शिवाय इतर लोकांना, जे स्वतःची स्वच्छता संबंधित व्यवस्था करण्यात असमर्थ आहेत त्यांना दोन खड्डयाच्या शौचालयाच्या निर्मितीसाठी मदत करून गाव, वाडया, वस्ती यांना हागणदारीमुक्त करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यायला हवे. शौचालयाचा वापर, हात धुण्याची सवय आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयींमध्ये वर्तनबदल करण्यात सहभागी व्हावे. सांडपाणी आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी कमी करणे, पुनर्रप्रक्रिया आणि पुनर्रउपयोग या सिद्धांताचा स्वतः अंगीकार करून इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यावेळी शिवण नदी पात्रात गणपती विसर्जनामुळे झालेल्या निर्माल्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी,जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, विविध यंत्रणांचे प्रमुख, श्रमदानात जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड, विस्तार अधिकारी सागर राजपुत, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील, युवराज सुर्यवंशी, अधिकारी, महाविद्यालयांचे कर्मचारीवर्ग, विद्यार्थी, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, आदी शिक्षक, सरपंच, युवावर्ग, खामगाव, पाटीलपाडा, विरचक, टोकरतलाव, ढेकवद येथील अंगणवाडीताई, आरोग्य कर्मचारीवर्ग यांनीदेखील शिवण नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविले दरम्यान संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, चित्रकला प्रदर्शन व श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती करून स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी विरचक येथील सरपंच अमृत ठाकरे, खामगाव येथील सरपंच रोशनी गोसावी यांच्यासह गावातील अनेक तरुण या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. याप्रसंगी ग्रामस्थांनी हजारो गणेशमूर्ती व सुमारे एक टन निर्माल्य संकलित करून नदी व नदीकाठचा परिसर स्वच्छ केला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना स्वच्छता ही सेवा उपक्रमाबाबत मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व नदीचे महत्व व नदीची स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले.
श्रमदानात विरचक सरपंच अमृत ठाकरे उपसरपंच रमेश ठाकरे, दिलीप ठाकरे, राजू ठाकरे, ग्रामसेविका एन. एच. बडगुजर, खामगाव येथील सरपंच रोशनी गोसावी, राजेश वसावे, उपसरपंच रजनी नरेंद्र पाटील, ढेकवद प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल वळवी, डॉ. शितल गावीत, पोलीस पाटील भरत मोरे, विनेश भिल, प्रशांत पाटील, जयेश पाटील, ग्रामसेवक सुभाष पावरा, आदीसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्त्या, युवक मंडळ, एम के डी शैक्षणिक संकुलाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.