आगामी निवडणूकीत महायुतीच्या विजयासाठी कामाला लागा — नामदार गिरीश महाजन
आगामी निवडणूकीत महायुतीच्या विजयासाठी कामाला लागा — नामदार गिरीश महाजन
जळगाव प्रहार
जामनेर –आज दिनांक 7 जुलै 2024 रोजी भारतीय जनता पक्ष जामनेर तालुक्याची विस्तृत बैठक मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली , यावेळी सर्व जि. प. सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, आजी -माजी पदाधिकारी, गट प्रमुख, गण प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वारीयर्स, बुथ प्रमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यमोठ्या संख्येने उपस्थित होते .
एकलव्य प्राथमिक विद्यामंदिर, छत्रपती शिवाजी महाराज नगर जळगाव रोड,जामनेर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
भारतीय जनता पार्टी जामनेर विधानसभा मतदारसंघाची विस्तृत बैठक बैठकीस नामदार गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुकीत महायुतीच्या भव्य विजयासाठी आपण सर्वांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन उपस्थितांना केले.
यावेळी जामनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.