ग्रामीणआर्थिक

जि. प. शाळा इटवाई व हरणमाळ शाळेत “शाळा पूर्वतयारी मेळावा” संपन्न. नंदुरबार

जि. प. शाळा इटवाई व हरणमाळ शाळेत “शाळा पूर्वतयारी मेळावा” संपन्न. नंदुरबार दि.२० (प्रतिनिधी ) नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रातील जि. प. शाळा हरणमाळ व इटवाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळा तयारी अभियानांतर्गत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्येची देवता सरस्वती माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून मेळाव्यास सुरुवात झाली. स्टार्स प्रकल्पांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेबद्दल असणारी भीती दूर व्हावी या हेतूने शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन १५ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान करण्याच्या सूचना श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी दिल्या. त्या अनुषंगाने शाळा, अंगणवाडी ताईच्या मदतीने नियोजन करण्यात आले होते. गावात दवंडी देऊन शाळा पूर्वतयारी मेळाव्याची जागृती केली. माता पालकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, भाषिक, भावनिक क्षमतांचा खेळमिळीच्या वातावरणात आढावा घेतला. ‘शाळेतले पहिले पाऊल’ या पुस्तकेतील कृती इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांनी माता पालकांच्या मदतीने करून घेणे, आयडिया व्हिडिओ समजून घेऊन विद्यार्थ्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणे यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. इयत्ता पहिली मध्ये दाखल पात्र विद्यार्थी यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्याचे शालेय आवारात स्वागत करण्यात आले. तसेच सर्व नवागतांचे गुलाबपुष्प, फुगे देवून स्वागत करण्यात आले. पूर्व तयारी मध्ये विविध पोस्टर, फुगे लावून शाळा परिसर सजविण्यात आला होता. प्रसन्न वातावरणात दाखल विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर नियोजनाप्रमाणे या मुलांचे विकास पत्र भरुन घेण्यात आले. विकास पत्रातील शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी या अनुषंगाने विविध साधनांच्या साहाय्याने मुलांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाची रूपरेषा मुख्याध्यापक संजय कोकणी यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणजित गावीत, मुख्याध्यापक संजय कोकणी, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, होमगार्ड सोमनाथ कोकणी, हरणमाळ शाळेच्या मुख्याध्यापिका छोटीबाई पाटील, हरणमाळ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजित गावित, अंगणवाडी सेविका भिलकीबाई गावीत व दाखल पात्र विद्यार्थी यांचे पालक सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}