ग्रामीण

एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही         – राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्य

एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही

– राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्य

 

जळगाव, — सरकारनें आदिवासींच्या न्याय हक्कासाठी कायदे केले आहेत, त्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करायला लावण्याबरोबर एकही आदिवासी बांधव त्यांच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही याबाबतीत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने 100 दिवसाचा कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी दिली.

जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या समवेत अंकीत सेन,गोवर्धन मुंडे,राजीव स्क्सेना अमृत प्रजापती हे आयोगाचे अधिकारी होते.

13 सप्टेंबर रोजी त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, यावलचे उपवनसरंक्षक जमिल शेख, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे , सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

यावेळी अंतरसिंह आर्य म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवसापासून ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाची सुरवात केली असून त्यात त्यांनी आपल्या आईच्या सन्मानाकरीता त्यांच्या नावे एक वृक्ष लावावा असे आवाहन देशवशियांना केले होते. त्यानुसार देशभरात ‘एक पेड मॉं के नाम’ अभियानातंर्गत वृक्षारोपण करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग व वनविभागाने फळवृक्ष लागवडी संदर्भात पुढाकार घ्यावा.या अभियांनातर्गत सर्व ग्रामीण भागात ‘एक पेड मॉं के नाम ‘अभियानातंर्गत वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र व राज्य सरकारच्या आदिवासी विकासाच्या योजनांची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना योजनेचा लाभ द्यावा. आश्रमशाळेस महिन्यांतून एकदा भेट द्यावी. आदिवासींच्या उपजिविकेसाठी वनोपज वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच वनपट्ट्यांचे वाटपही वेळेत करण्याच्या सुचना श्री.आर्य यांनी दिल्या. त्याचबरोबर रोजगारासाठी मनेरगा अतंर्गत सर्व रस्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात यावे, जेणेकरुन रोजगाराबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. रोजगारासाठी स्थानिक पातळीवर कुकुटपालन व्यवसायाकरीता पोल्ट्रींची संख्या वाढवावी अशी सुचनाही श्री. आर्य यांनी केली.

चोपडा, यावल व रावेर तालुक्यात शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी एकलव्य स्कुलसाठी प्रस्ताव पाठवावा. तसेच आदिवासी समाजातील नागरिकांच्या जमीन हडप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक

दोन दिवशीय दौऱ्यात चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी येथे दिलेल्या भेटीवेळी व स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तसेच आदिवासी बांधवांसाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करुन अध्यक्ष आंतरसिंग आर्या यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकारी वेवोतोलू केझो यांचा केला सन्मान

नागालँड येथील आदिवासी समाजातून पहिल्या महिला आय.ए. एस. अधिकारी होण्याचा मान वेवोतोलू केझो यांना मिळाला असून सध्या प्रशिक्षणार्थी आय.ए.एस अधिकारी म्हणून जळगाव येथे रुजू आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सर्व सदस्यांना या गोष्टीचा अभिमाना असल्याचे सांगून आपल्याला व्यक्तीश: आपल्याला खुप आनंद झाल्याची भावना आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी व्यक्त केली.

या दौऱ्यात अंतरसिंह आर्य यांच्या उपस्थितीत शासकीय आदिवासी आश्रम शाळा कृष्णपूर, या शाळेकरीता वनविभागाने 1 हेक्टर जमीन 3(2 )या दाव्या अंतर्गत प्रकल्प कार्यालय यावल विभागास उपवन संरक्षक जमीर शेख यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना हस्तांतरित केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}