रा कॉ शरदचंद्र पवार पक्षाकडून जामनेरात दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहिर ,
रा कॉ शरदचंद्र पवार पक्षाकडून जामनेरात दिलीप खोडपे यांना उमेदवारी जाहिर ,
जळगाव प्रहार
जामनेर –शिवस्वराज्य यात्रा जामनेर शहर येथे पोहोचली. जामनेरकरांनी मोठ्या मनाने स्वागत केले. इथल्या सामान्य माणसाच्या डोळ्यांमध्ये उद्याची आशा मला दिसली. उद्याचे भविष्य दिसले. परिवर्तनाची नांदी चेहऱ्यावर स्पष्ट दिसली.
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. दिलीप खोडपे सरांनी आज रा कॉ शरद पवार पक्षात प्रवेश केला. जो कोणी पक्ष उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार असे त्यांनी म्हंटले. मात्र मी खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या समंतीने त्यांच्या हातात तुतारी दिली त्यातच सर्व आलं. समझने वालोंको इशारा काफी हैं… खोडपे सर ही कुस्ती चितपट करतील हा आम्हाला विश्वास आहे. आता जामनेरच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे. असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले .
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की ,
असे एकही विकास काम नाही जिथे सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला नाही. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यातही यांनी पैसे खाल्ले. हा पुतळा कोसळला म्हणजेच महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असे आम्ही मानतो. सत्ताधारी प्रत्येक आमदाराला याचे प्रायश्चित्त देण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले .
यावेळी आ , एकनाथ खडसे , खासदार अमोल कोल्हे , गुलाबराव देवकर , रोहिणी खडसे , माजी मंत्री सतिश पाटील , मेहबुब शेख , डि के पाटील , रविंद्र पाटील ,प्रमोद पाटील , डॉ मनोहर पाटील , अनिल बोहरा , यांच्यासह रा कॉ शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हजर होते .
यावेळी आ एकनाथ खडसे , खा अमोल कोल्हे ,सतिश पाटील , डी के पाटील ,गुलाबराव देवकर , यांनी आपल्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार प्रहार करून दिलीप खोडपे यांना यंदा निवडूण देण्याचे आवाहन केले .
दिलीप खोडपे यांनी आपल्या भाषणात भाजपा का सोडली याबाबत आपले मनोगत व्यक्त केले .